भेटी लागी जीवा लागलीसे आस…!
महाराष्ट्राची एक वैशिष्ट्यपूर्ण आध्यात्मिक परंपरा असलेल्या आषाढी वारीचा सोहळा दरवर्षी भक्तिभावाने साजरा केला जातो. पंढरपूरची यात्रा, संतांची पालखी आणि विठ्ठलनामाच्या गजरात पायी चालणारे वारकरी हे आपल्या राज्याचे आध्यात्मिक वैभव आहे.
या आषाढी वारीच्या निमित्ताने, देहू येथून श्री संत तुकाराम महाराजांची आणि आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असून, विठ्ठलनामाचा गजर करत लाखो वारकरी या पवित्र यात्रेत सहभागी होतात.
या पालखी सोहळ्याचे पुणे शहरात स्वागत करण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणेकर सज्ज झाले असून, इंद्रायणीच्या तीरावरून निघालेले वारकरी भक्तिभावाने चंद्रभागेच्या संगमाकडे वाटचाल करणार आहेत.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
- १९ जून: आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान – रात्री ८ वाजता धार्मिक विधी आणि सामुदायिक प्रार्थनेसह पालखीचे प्रस्थान.
- २० आणि २१ जून: पुणे शहर – पुणे शहरात आगमन आणि मुक्काम.
- २२ आणि २३ जून: सासवड – पालखीचे सासवडकडे प्रस्थान, सासवडमध्ये भक्तीपर कार्यक्रम आणि मुक्काम.
- २४ जून: जेजुरी – आध्यात्मिक प्रवचन आणि संध्याकाळचे भजन.
- २५ जून: वाल्हे – पारंपरिक अर्पण आणि सामुदायिक संवाद.
- २६ जून: लोणंद – भक्तीगीत गायन आणि विश्रांतीसाठी मुख्य विराम.
- २७ जून: तरडगाव – चांदोबाचा लिंब येथे पहिले रिंगण आणि तरडगाव येथे मुक्काम.
- २८ जून: फलटण – आध्यात्मिक उपक्रम आणि व्याख्याने.
- २९ जून: बरड – विश्रांती आणि आध्यात्मिक उपक्रम.
- ३० जून: नातेपुते – संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांचा आणि ओव्यांचा जप.
- १ जुलै: माळशिरस – पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण घेऊन पालखीचे माळशिरस येथे मुक्काम.
- २ जुलै: खुडूस फाटा – खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण करून वेळापूरळा मुक्काम.
- ३ जुलै: वेळापूर – ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण.
- ४ जुलै: भंडीशेगाव – दुसरे उभे रिंगण.
- ५ जुलै: वाखरी आणि पंढरपूर आगमन – वाखरी येथे पादुका आरती आणि तिसरे उभे रिंगण करून पालखी पंढरपूर येथे दाखल होईल.
- ६ जुलै: आषाढी एकादशी – विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्य उत्सव आणि दर्शन.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा:
- १८ जून: देहू – देहूहून पंढरपूरकडे प्रस्थान.
- १९ जून: आकुर्डी – पिंपरी चिंचवड परिसरात पालखीचे स्वागत.
- २० आणि २१ जून: पुणे शहर – सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसह भव्य स्वागत समारंभ.
- २२ जून: लोणी काळभोर – भक्ती संमेलन कार्यक्रम.
- २३ जून: यवत – अनेक वारकऱ्यांच्या आणि दिंड्यांचा सहभाग.
- २४ जून: वरवंड – पारंपारिक प्रार्थना आणि अल्पकालीन विश्राम.
- २५ जून: उंडवडी गवळ्याची – आध्यात्मिक व्याख्याने आणि मुक्काम.
- २६ जून: बारामती – स्थानिकांकडून भक्तिभावासह स्वागत.
- २७ जून: सणसर – आध्यात्मिक प्रवचने, विश्रांती आणि सांस्कृतिक कार्यक्रम.
- २८ जून: निमगाव केतकी – संत तुकारामांच्या अभंगांचा आणि कीर्तनांचा जप.
- २९ जून: इंदापूर – विश्रांती मुक्काम
- ३० जून: सराटी – भक्तीगीत गायन आणि व्याख्याने.
- १ जुलै: आकालुज – आकालुज येथे गोल रिंगण.
- २ जुलै: बोरगाव – माळीनगर येथे उभे रिंगण करून बोरगाव इथे मुक्काम.
- ३ आणि ४ जुलै: वाखरी – पंढरपूरला पोहोचण्यापूर्वी शेवटचा मोठा मुक्काम.
- ५ जुलै: पंढपूरमध्ये आगमन – वाखारी येथे शेवटचा मुक्काम मोठा मुक्काम करून पालखीचे पंढरपूर मध्ये आगमन.
- ६ जुलै: आषाढी एकादशी – विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्य उत्सव आणि दर्शन.