उ: DMA हे नगर विकास विभाग २ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचे समन्वय व कार्यक्षम शहरी प्रशासन सुनिश्चित करणारे राज्यस्तरीय कार्यालय आहे.

उ: सध्या महाराष्ट्रात एकून 424 नागरी स्थानिक संस्था आहेत, ज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.

उ: नागरी स्थानिक स्वराज्य संस्था पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते दिवे, कचरा व्यवस्थापन आणि शहरी नियोजन यांसारख्या सेवा पुरवतात.

उ: या संस्था महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागांतर्गत असलेल्या नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या नियंत्रणाखाली आहेत.

उ: महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1949 आणि महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, 1965 यांच्या आधारे चालतात.

उ: हे वर्गीकरण लोकसंख्येवर आधारित आहे – मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका, मध्यम शहरांसाठी नगरपालिका आणि लहान शहरांसाठी नगरपंचायत असते.

उ: प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्त आणि लोकनियुक्त प्रमुख म्हणून महापौर असतो.

उ: मुख्य अधिकारी नगरपालिका प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळतात.

उ: नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे मुख्यालय सातवा मजला, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आहे.

उ: नागरिक https://mahadma.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाद्वारे संपर्क करू शकतात.

उ. नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई, महाराष्ट्रचे आयुक्त व संचालक हे श्री. अभिषेक कृष्णा, (आय.ए.एस.) आहेत.

उ: आपल्या नगरपालिकेतील CFC विभागात भेट द्या, तिथे तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.

उ: मालमत्ता कराची पावती आणि आवश्यक कागदपत्रे ULB कार्यालयात सादर करावी लागतात.

उ: आपण ऑनलाइन, हेल्पलाईन क्रमांकावर किंवा नगरपालिका हेल्पडेस्कवर तक्रार नोंदवू शकता.

उ: बांधकाम परवानग्या BPMS (Building Permission Management System) ऑनलाइन पोर्टलवरून दिल्या जातात.

उ: अर्ज क्रमांक वापरून ULB च्या पोर्टलवर अर्जाची स्थिती पाहू शकता.

उ: आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कासह ऑनलाइन किंवा स्थानिक कार्यालयात अर्ज करा.

उ: ULB नागरिक सेवा पोर्टलवर किंवा वॉर्ड कार्यालयात विनंती नोंदवा.

उ: पुरावे जोडून सुधारणा अर्ज नोंदणी अधिकारी (ULB) कडे सादर करावा.

उ: सर्वसाधारणपणे सकाळी 09:45 ते सायं. 06:15, सार्वजनिक सुट्टी वगळता.

उ: संबंधित ULB च्या सार्वजनिक माहिती अधिकार्‍याकडे RTI अर्ज दाखल करा.

उ: एकात्मिक वेब-आधारित पोर्टल (IWBP) हे सर्व ULB डेटा आणि नागरिक सेवांसाठी एक ऑनलाइन प्रणाली आहे ज्यामार्फत विविध नागरिक सेवा पुरविल्या जातात. 

उ: जन्म/मृत्यू दाखले, मालमत्ता कर भरणा, व्यापार परवाने व तक्रार नोंदणी इत्यादी ऑनलाइन करता येते.

उ:https://mahaulb.in/MahaULB/property/propertyOnlinePay वर जाऊन ऑनलाइन पेमेंट पर्याय वापरा.

उ: ULB कार्यालयात किंवा ऑनलाइन पेमेंट पोर्टलवर https://mahaulb.in/MahaULB/water/showServicePage/payMyDues भरता येते.

उ: व्यापार परवाना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा:
https://mahaulb.in/MahaULB/duplicate/application/showServicePage/TRL/renewal-tradelic/market

उ: होय, डिजिटल स्वाक्षरी असलेली ई-रसीद अधिकृत पुरावा म्हणून ग्राह्य आहे.

उ: होय, बहुतांश ULB मध्ये नागरिक पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज करता येतो.

उ: BPMS प्रणालीद्वारे ऑनलाइन बांधकाम परवानगी अर्ज, तपासणी आणि मंजुरी करता येते.

उ: नगरपालिकेच्या https://mahaulb.in/MahaULB/ या संकेतस्थळावरील “नागरिक सेवा” पर्याय वापरा.

उ: संबंधित ULB च्या आयटी किंवा ई-गव्हर्नन्स विभागास कळवा किंवा ऑनलाईन पोर्टल द्वारे आपण अभिप्राय नोंदवू शकता.

उ: होय, बहुतांश प्रमाणपत्रे आणि पावत्या अधिकृत अधिकारी डिजिटल स्वाक्षरी करतात.

उ. महाराष्ट्र शासनाच्या संचालनालय, नगरपरिषद प्रशासन (DMA) चे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी खालीलप्रमाणे प्रक्रिया अवलंबावी:
Google Chrome, Mozilla Firefox किंवा Microsoft Edge यांसारखा कोणताही इंटरनेट ब्राउझर उघडा.

अ‍ॅड्रेस बारमध्ये https://mahadma.maharashtra.gov.in
असा पत्ता टाका.

Enter बटण दाबून DMA चे संकेतस्थळ उघडा.

उ: https://mahaulb.in/MahaULB/web/marriage/initRegistration.html या लिंकवर जाऊन अर्ज सादर करून विवाह नोदणी अर्ज सादर करता येईल. 

उ: मालमत्ता कर, पाणी कर, स्वच्छता शुल्क आणि व्यापार परवाना शुल्क इत्यादी.

उ: ULB च्या मूल्यांकन नियमांनुसार क्षेत्रफळ, वापर आणि स्थान यावर आधारित असतो.

उ: विलंब झाल्यास दंड आणि व्याज आकारले जाऊ शकते.

उ: होय,https://mahaulb.in/MahaULB/ संकेतस्थळावरील “नागरिक सेवा” विभागात करनिर्धारण यावरून डाउनलोड करता येते.

उ: आपल्या मालमत्ता किंवा व्यापारावर कोणतेही थकबाकी नाही हे प्रमाणपत्र दर्शवते.

उ: आपल्या नगर पालिकेत आवश्यक पुरावे जोडून कर विभागाकडे लेखी अर्ज सादर करा.

उ: पाणीपुरवठा, मलनिस्सारण आणि हरित क्षेत्र निर्मितीसाठी ‘अटल मिशन फॉर रीजुव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन’ ही योजना आहे.

उ: प्रधानमंत्री आवास योजना–शहरी 2.0 (PMAY-U 2.0) अंतर्गत शहरी भागातील पात्र कुटुंबे/लाभार्थींना परवडणारी घरे बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने घेण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश/PLIs यांच्या माध्यमातून केंद्र शासनाची आर्थिक मदत प्रदान करण्याचा उद्देश आहे.

PMAY (U) योजनेअंतर्गत घरासाठी अर्ज करण्यासाठी, पात्र लाभार्थी PMAY-U च्या एकत्रित वेब पोर्टलवर, कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSC) मार्फत किंवा ते ज्या संबंधित शहरी स्थानिक स्वराज्य संस्था/नगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास आहेत तेथे प्रत्यक्ष भेट देऊन, विहित नमुन्यात अर्ज सादर करू शकतात.

उ: शहरे स्वच्छ ठेवणे, कचरा वर्गीकरण आणि मुक्त शौचालयीय स्थिती साध्य करणे हा योजनेचा उद्देश आहे.

उ: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत आणि नागरिकाभिमुख शहरी विकास प्रोत्साहन देण्याची योजना आहे.

उ: शहरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि ULB चे आधुनिकीकरण करण्यासाठी राज्यस्तरीय योजना आहे.

उ:पीएम-स्वनिधी ही भारत सरकारने सुरू केलेली केंद्रीय क्षेत्रातील योजना असून, कोविड-१९ लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल झाल्यानंतर रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना (स्ट्रीट व्हेंडर्स) आपला उपजीविकेचा व्यवसाय पुन्हा सुरू करता यावा, यासाठी त्यांना परवडणारे कार्यभांडवल कर्ज उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

उ: https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उ: ULB कार्यालयाशी संपर्क करा किंवा अधिकृत संकेतस्थळावर तपासा.

उ: DMA किंवा महानगरपालिकेच्याच्या संकेतस्थळावर भरती जाहीराती प्रकाशित केल्या जातात.

उ: अधिकृत पोर्टल https://mahadma.maharashtra.gov.in/ येथे उपलब्ध आहे.